U T K A R S H

For the past 44 years, Lok Utkarsh Samiti has been tirelessly working to bring about meaningful change in society, driven by the timeless ideals of service, sanskar (cultural ethos), and harmony. Inspired by the belief that “To serve humanity is to honor the divine,” the organization is deeply committed to creating a more inclusive and empowered society through focused efforts in the areas of education, healthcare, and self-reliance.

लघु व्यवसायिकांसाठी लोक उत्कर्ष समितीचे उपक्रम -

भारतातील अर्थव्यवस्थेत सूक्ष्म आणि लघु व्यवसायांना विशेष महत्त्व आहे. या व्यवसायांमुळे ग्रामीण व शहरी भागात रोजगारनिर्मिती होते.तसेच कमी भांडवलात उद्योजकतेच्या संधी निर्माण होतात. स्थानिक गरजा पूर्ण करण्यासोबतच हे व्यवसाय मोठ्या उद्योगांना पूरक ठरतात. महिलांना व युवकांना व्यवसायाच्या माध्यमातून प्रगतीची संधी मिळते आणि त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.

तथापि, प्रत्यक्षात असे दिसून येते की अनेक उद्योजक व्यवसाय सुरू करतात, परंतु त्यांना व्यवसायाच्या विविध अंगांविषयी मर्यादित माहिती असते. यामुळे व्यवसायाची गुणवत्ता, वाढ व स्थिरता यावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर लोक उत्कर्ष समितीने सूक्ष्म व्यवसायिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली .

समितीमार्फत नेतृत्वगुण, लेखा व वित्तीय व्यवस्थापन, विक्री, विपणन, गुणवत्ता व्यवस्थापन आदी विषयांवर नियमितपणे मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत “हिशेब कसा ठेवावा”, “सेल्स अँड मार्केटिंग ” यांसारख्या विषयांवर काही प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले असून व्यावसायिकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन दर महिन्याला विविध विषयांवर केले जात असून त्याचा उद्देश सूक्ष्म आणि लघु व्यवसायिकांना सक्षम करणे, त्यांचा व्यवसाय वाढविणे आणि दीर्घकालीन स्थिरता मिळवून देणे हा आहे.

Lok Utkarsh Samiti’s Initiatives for Micro and Very Micro Businesses

Small and Micro businesses hold a special place in India’s economy. They play a crucial role in generating employment in both rural and urban areas, by creating opportunities for entrepreneurship with minimal investment. Along with meeting local needs, these businesses also support large industries. The provide opportunities for women and youth, thereby contributing to the holistic development of society.

However, it is observed that many entrepreneurs possess only limited knowledge of various aspects of business management. This often affects the quality, growth, and sustainability of their enterprises. Considering this need, Lok Utkarsh Samiti has taken the initiative to organize training programs aimed at overall development of micro business owners.

Through these programs, guidance is provided at important business levels such as leadership, accounts and financial management, sales, marketing, and quality management. So far, training sessions on topics such as “How to Maintain Accounts” and “Sales and Marketing” have been conducted, and have reviewed an encouraging response from entrepreneurs.