कै.श्री. राजाभाऊ भोसले स्मृती भवन बांधकाम
ट्रस्टच्या इमारतीचे बांधकाम
रक्तदान शिबीरे, उद्योजकांचं नेटवर्क, प्रेरणादायी व्याख्यानमाला आणि आता आपलं स्वतःचं कार्यालय !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या राष्ट्राच्या परमवैभवाचे ध्येय समोर ठेवून गेली 100 वर्षे कार्यरत आहे. संघाचे काम व्यक्ती निर्माणातुन समाज परिवर्तनाचे आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या जडणघडणीत शाखा, बैठका ,बौद्धिक वर्ग, निवासी वर्ग, नैपुण्य वर्ग, अभ्यास वर्ग इत्यादी चे विशेष महत्त्व आहे. हे सर्व कार्यक्रम ज्या ठिकाणी आपण करतो ते आपले हक्काचे, जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे आपले संघ कार्यालय. सध्याचे कार्यालय हे कोल्हापुरातील तस्ते गल्लीमध्ये एका फ्लॅटच्या स्वरूपात सुरु झाले. सध्याचे कार्यालय अपुरे पडत असल्यामुळे भविष्यात संघ कामासाठी उपयुक्त अशी मोठी, वापरासाठी योग्य अशी इमारत उभी करण्याचा सर्व स्वयंसेवक बंधुनी निश्चय केला.
सध्या सर्व देशभर हिंदुत्व अनुकूल वातावरण आपण अनुभवतो आहोत. आपल्या जिल्ह्यातील संघ कामाचा झालेला विस्तार , वाढती स्वयंसेवक व प्रवासी कार्यकर्त्यांची संख्या व या सगळ्या कामाच्या सुसूत्रतेसाठी बैठका, प्रशिक्षण वर्गांची वाढलेली गरज लक्षात घेऊन आपल्या जिल्ह्यासाठी भव्य कार्यालय उभारण्याचा संकल्प आपण दोन वर्षांपूर्वी केला. त्यानुसार लोक उत्कर्ष समितीच्या नूतन इमारतीसाठी नाव ठरवले “राजाभाऊ भोसले स्मृती भवन”.
कार्यालयासाठी 5000 स्क्वेअर फुटाची जागा खरेदी करण्याचा पहिला टप्पा आपण पूर्ण केला आहे. आता यापुढील टप्प्यामध्ये आठ हजार स्क्वेअर फुट बांधकामाचे , तीन मजली सुविधा युक्त कार्यालय उभारण्याचे आपले उद्दिष्ट आहे. संघाच्या शताब्दी वर्षात म्हणजे 2026 ला हे नवीन कार्यालय पूर्णत्वास गेलेले पाहण्याचा आनंद आपल्या सर्वांना मिळणार आहे. आपल्या सर्व स्वयंसेवक व संघ हितचिंतकांच्या यथोचित योगदानातून आपण हा प्रकल्प लवकरच पूर्ण करू, हा विश्वास आहे. बांधकाम, त्यापुढील मेंटेनन्स व इतर खर्च यासाठी आपल्याला फार मोठा आर्थिक निधी उभा करावा लागणार आहे. त्यासाठीच आपण निधी संकलन अभियानाची सुरुवात 1 ऑगस्ट 2023 पासून केलेली आहे. हा निधी फक्त संघ स्वयंसेवक व संघ हितचिंतकांच्या योगदानातून उभा राहणार असल्याने , आपल्याकडून जास्तीत जास्त सहकार्याची अपेक्षा आहे.
Trust Headquarter Project | Late Shri. Rajabhau Bhosle Smriti Bhavan Construction
After decades of impact through activities like blood donation camps, entrepreneurial networking, and inspiring lecture series, Lok Utkarsh Samiti is now building its own permanent headquarter.
For the past 100 years, the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) has been working toward the vision of a glorious and united nation. At the heart of this mission is individual transformation for social change, supported through regular shakhas, meetings, intellectual sessions, training camps, and study groups.
A dedicated office space serves as the emotional and operational center of such efforts. The first center of the Trust was a modest flat at Taste Galli, Kolhapur. However, with the growing number of volunteers and expanding activities, there is now a need for a larger and more functional facility.
Two years ago, we took a pledge to build a new, fully-equipped three-story building named “Rajabhau Bhosale Smriti Bhavan.” We have already completed the first phase — the purchase of 5,000 sq. ft. of land. The next step is the construction of an 8,000 sq. ft., three-story building, which we aim to complete by 2026, aligning with the centenary year of RSS.
To achieve this, a fundraising campaign was launched on August 1, 2023. Since this initiative is entirely community-driven, we humbly seek generous contributions from all volunteers, supporters, and well-wishers of the Trust.
We are confident that, just as you have supported us in the past, you will stand with us once again to complete this noble project.
Special Thanks to the Supporters Who Have Already Contributed Toward the Construction of the Smriti Bhavan