40+
वर्ष अखंड
कार्यरत
लोक उत्कर्ष समिती
राष्ट्राय स्वाहा ! राष्ट्राय इदं न मम!
हे ब्रीद घेऊन लोक उत्कर्ष समिती गेली ४४ वर्षे अखंड कार्यरत आहे.
आमच्या कार्याचा पाया सेवा, संस्कार आणि समरसता या त्रिसूत्री मूल्यांवर आधारित असून, ट्रस्ट शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये कार्य करते.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पीडित, अपंग, वृद्ध आणि वंचित घटकांच्या उत्कर्षासाठी कार्य करणे हा ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार शिक्षण व वैद्यकीय सहाय्य, उद्योग व रोजगार मार्गदर्शन, सेंद्रिय शेती व जलसंवर्धनाचे मार्गदर्शन, तसेच ग्रामविकास आणि सांस्कृतिक प्रबोधन अशा विविध माध्यमांतून सर्वांगीण सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न ट्रस्टद्वारे सातत्याने केला जातो.
लोक उत्कर्ष समिती हा ट्रस्ट आयकर नियम ८०-जी अंतर्गत सवलतीस पात्र आहे.
To serve humanity is to honour the divine
For the past 44 years, Lok Utkarsh Samiti has been tirelessly working to bring about meaningful change in society, driven by the timeless ideals of service, sanskar (cultural ethos), and harmony. Inspired by the belief “To serve humanity is to honor the divine,” the organization is deeply committed to creating a more inclusive and empowered society through focused efforts in the areas of education, healthcare, and self-reliance.
The Trust is dedicated to the holistic upliftment of economically weaker sections, the underprivileged, the elderly, persons with disabilities, and other marginalized communities. Its initiatives include providing educational and medical support, offering guidance for generation of employment and upgrading of small-scale industries, promoting organic farming and water conservation, and fostering rural development along with cultural awareness. Every effort is aimed at nurturing a self-reliant, compassionate, and ethically grounded society.
Lok Utkarsh Samiti is a registered charitable trust, and all donations made to it are eligible for tax exemption under Section 80G of the Income Tax Act.
Projects
१४ ऑगस्ट – अखंड भारत स्मार दिन संकल्प दरवर्षी या दिवशी अखंड भारत करण्याचा संकल्प केला जातो, व यानिमित्त कोल्हापूर शहराच्या विविध भागांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.
Know More
सर्व महापुरुषांना त्यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते.राजाभाऊ भोसले रुग्णोपयोगीसाहित्य सेवा केंद्र या अंतर्गत गरजू रुग्णांना वॉकर , व्हील-चेअर, कमोड चेअर, एअर बेड, फोल्डिंग बेड, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इ. साहित्य विनामुल्य दिले जाते.
Know More